संदर्भ : १) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : जिपब २०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४ दि. १८.०६.२०२४ २) महाराष्ट्र शासन,ग्रामविकास विभाग,बदली वेळापत्रक क्रमांक न्यायाप्र-२०२४/प्र.क्र.१०५/आस्था-१४दि.०७.११.२०२४ उपरोक्त विषयी वरील संदर्भ क्रमांक ०१ मधील शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया संगणकीय प्रणालीने ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविण्यात येणार आहे.
संदर्भ क्रमांक ०२ नुसार बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, ऑनलाईन पोर्टलद्वारे बदली प्रक्रियेसाठी संपूर्ण राज्यासाठी राज्यस्तरावरून विहित वेळापत्रक निश्चित केलेले आहे.या वेळापत्रकातील निश्चित दिनांकानुसार बदली संदर्भाने विहित आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश प्राप्त आहेत. या वेळापत्रकातील मुद्दा क्रमांक ०४ मधील १ ते १० मध्ये नमूद दिनांकानुसार विहित कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
संदर्भ क्र.०२ मधील मुद्दा क्रमांक ४ मधील ०१ नुसार दिनांक ०१ जानेवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान “शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे (बदली पात्र शिक्षक, बदली अधिकार प्राप्त शिक्षक इत्यादी याद्या) व त्यानुषंगाने प्राप्त आक्षेप यावर निर्णय घेणे” व मुद्दा क्रमांक ०५ नुसार “ बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे / अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कार्यवाही दि.२८ फेब्रुवारी पर्यंत अंतिम करण्यात यावी. बदली प्रक्रिया सुरु झाल्यांनतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही.” असे आहे. प्राथमिक शिक्षक बदली संदर्भाने संदर्भ क्रमांक ०१ व ०२ नुसार विहित वेळापत्रकानुसार निश्चित केलेली कार्यवाही करणे अपेक्षित आहे. प्राथमिक शिक्षक बदल्यांमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग ०१ व विशेष संवर्ग शिक्षक भाग ०२ मध्ये सहभागी होवू इच्छित असलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची (संचिका) / प्रमाणपत्रांची पडताळणी अपेक्षित असल्याच्या अनुषंगाने वरील संदर्भ क्र. ०१ मधील विशेष संवर्ग शिक्षक भाग ०१ करीता जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र / प्रति स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्रासह तरतूद क्रमांक ४.२.८ व विशेष संवर्ग शिक्षक भाग ०२ करीता तरतूद क्रमांक ४.३.५ नुसार संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करून पात्र व अपात्र शिक्षकांच्या याद्या तालुकास्तरावर घोषित कराव्यात व आक्षेपाचे निराकरण करून तालुकास्तरीय समितीच्या स्वाक्षरीने संवर्गनिहाय अंतिम पात्र यादीचा अहवाल खालील प्रमाणे या कार्यालयाकडे सादर करावा.
प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली २०२५ : तालुकास्तरीय समिती प्रमाणपत्र पडताळणी पात्र / अपात्र शिक्षक अहवाल शिक्षकाचे शाळा संवर्ग संवर्गातील सक्षम प्रमाणपत्र प्रमाणपत्र कागदपत्रे.
प्राथमिक शिक्षक संवर्गामध्ये प्राथमिक शिक्षक, प्राथमिक पदवीधर व पदोन्नत मुख्याध्यापक या तीन पदांचा समावेश आहे.सदरील बदली प्रक्रियेदरम्यान सर्व शिक्षकांनी स्वतःची सेवाविषयक व वैयक्तिक माहिती ऑनलाईन पोर्टलवर नमूद करणे अथवा अद्ययावत करणे आवश्यक आहे. पोर्टलवर शिक्षकांनी नमूद केलेली माहिती पडताळणी करणे हे गटशिक्षणाधिकारी यांची जबाबदारी आहे. तालुक्यातील शिक्षकांची संख्या पाहता आपल्या अधिनिस्त तंत्रस्नेही शिक्षक व जाणकार शिक्षकांचा आवश्यक एक बदली कक्ष स्थापन करावा आणि आवश्यकतेनुसार कामासाठी त्यांची सेवा आपल्या कार्यालयात उपलब्ध करून घ्यावी.बदली पोर्टलवर शिक्षकांनी नमूद केलेली माहिती पडताळणी करताना संबंधित शिक्षकांच्या सेवापुस्तीकेवरून माहितीची पडताळणी करावी.
बदलीची माहिती पडताळणी करण्यासाठी आणि बदली प्रक्रीयेदरम्यान अथवा बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आक्षेप अथवा हरकती प्राप्त झाल्यास बदलीमध्ये समाविष्ट असलेल्या शिक्षकांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या अधिनिस्त सर्व शिक्षकांच्या कागदपत्र / प्रमाणपत्राच्या संचिका दोन प्रतीमध्ये हस्तगत करून घ्याव्यात. एक प्रत आपल्या कार्यालयामध्ये सुरक्षित जतन करून ठेवावी व एक प्रत या कार्यालयाने मागितल्यानंतर या कार्यालयात सादर करावी.
संदर्भ क्रमांक २ अन्वये मुद्दा क्रमांक ४ मधील १ नुसार आपल्या अधिनिस्त गटातील शिक्षकांच्या संवर्गनिहाय सर्व प्रकारच्या ऑफलाईन याद्या तयार करून ठेवाव्यात व या कार्यालयाने पुढील सुचना दिल्यांनतर या कार्यालयात सादर कराव्यात. मुद्दा क्रमांक ०५ नुसार बदली पोर्टलवर प्रोफाईल अपडेशन करण्याची सुरुवात झाल्यानंतर सर्व शिक्षकांना आपली वैयक्तिक माहिती नमूद अथवा अद्ययावत करण्यास अवगत करावे . शिक्षकांनी कार्यालयामार्फत पडताळणी करून घ्यावी.
केलेली माहिती आपल्या नमूद शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक ५.१०.५ मधील तरतुदीनुसार एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतली आहे अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन करून त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई मा.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रस्तावित करतील. ही तरतूद लक्षात घेता आपल्या गटातील कोणताही शिक्षक बदलीमध्ये खोटी अथवा दिशाभूल करणारी माहिती सादर करून बदलीमध्ये चुकीचा लाभ घेणार नाहीत याची पूर्णत: दक्षता घ्यावी अशी बाब आढळून आल्यास आपणास व तालुकास्तरीय समितीस सुद्धा जबाबदार धरण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली सन २०२५ साठी वरील संदर्भ क्रमांक ०१ चा शासन निर्णय आणि संदर्भ क्र. ०२ चे वेळापत्रक आपल्या अधिनिस्त सर्व शिक्षकांना अवगत करून द्यावे. बदली बाबत राज्य शासनाकडून अथवा वरिष्ठ कार्यालयाकडून येणारे निर्णय /आदेश /सूचना आपणांस वेळोवेळी अवगत करण्यात येतील .
संदर्भ क्रमांक ०१ मधील तरतुदीनुसार व ०२ मधील वेळापत्रकानुसार प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या विषयीची माहिती तयार करून बदली संदर्भाने आवश्यक ती कार्यवाही करावी. या कामी कोणत्याही नियमाचे उल्लंघन . चूक अथवा दिशाभूल होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. या कामी सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .