आजची पिढी पुढचा विचार करणारी आहे -शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे

शालेयवृत्त सेवा
0

 


ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न


नांदेड (शालेय वृत्तसेवा) :

       मानवी जीवन सुखकारक करण्यासाठी ज्या नवनवीन तंत्रज्ञानाची आवश्यकता असते, किंवा मानवी समस्या सोडविण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे अशा प्रयोगांचे सादरीकरण विज्ञान प्रदर्शनामधून होत असते. आजची ही पिढी पुढच्या दहा वीस वर्षांचे भविष्य पाहणारी पिढी आहे. म्हणून देशाला सुपर पॉवर होण्यासाठी असे प्रदर्शन उपयोगी ठरतील, असे मत शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे यांनी केले.

  

         नांदेड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. सविता बिरगे ( शिक्षणाधिकारी (प्रा.), नागराज बनसोडे (गटशिक्षणाधिकारी), व्यंकटेश चौधरी ( शिक्षणाधिकारी (मनपा), शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी शिंदे, लता कोठेकर, माधव दुधमल, विष्णु शेट्टी, मुख्याध्यापक हितेंद्र चुडावत यांची प्रमुख उपस्थिती होती.


           प्रारंभी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. शाळेच्या वतीने मान्यवरांचे औक्षण करून आणि स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

डॉ सविता बिरगे यांनी विज्ञान प्रदर्शनात जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे यांनी केले तर आभार विषयतज्ञ मारोती ढगे यांनी मानले.


       यावेळी केंद्रप्रमुख निरंजन भारती, मारोती घोडजकर, विजयकुमार धोंडगे, बालासाहेब मटके, व्यंकट गंदपवाड, गायकवाड, विषयतज्ञ प्रियांका बसवंते, एस के मोरे, केशव पतंंगे आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून आनंद सुरवसे, बी. जी. घाटे, श्रीमती ए.बी. आयनेले, श्स्वाती शिंदे, उर्मिला खिल्लारे, रवी पांचाळ, यांनी काम पाहिले. विजेत्यांना मनपा शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


निकाल

माध्यमिक स्तर

प्रथम-जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी, 

द्वितीय- ऑक्सफर्ड ग्लोबल, तृतीय-शिवाजी हायस्कूल माणिक नगर, 

प्राथमिक स्तर

प्रथम- गुजराती हायस्कूल  

द्वितीय-राणी लक्ष्मीबाई विद्यालय  

तृतीय-जिल्हा परिषद हायस्कूल वाघी 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)