मेहनती शिक्षकच ग्रामीण भागात शैक्षणिक चळवळ रुजवू शकतात-दिलीपकुमार बनसोडे

शालेयवृत्त सेवा
0

 



शिक्षण परिषदेत शिक्षक भूषण पुरस्कार वितरण


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

         ज्यावेळी गावातील नागरिकांना आपल्या गावाचा शिक्षक विद्यार्थी हितासाठी तळमळीने झटताना, काम करताना दिसून येतो तेव्हा ग्रामस्थ शिक्षकाच्या प्रयत्नांना जरूर साथ देतात. त्यावेळी गावकरी आणि शाळा यांच्या संयुक्त प्रयत्नाने गावात शैक्षणिक चळवळीचे वातावरण निर्माण होऊन गुणवत्ता सुधारता येऊ शकते. असे प्रयत्न सार्वत्रिक व्हायला हवेत, अशी अपेक्षा शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांनी व्यक्त केली.  


        अक्षर परिवार नावाने सुप्रसिद्ध असणाऱ्या वाजेगाव बीट स्तरीय शिक्षक भूषण पुरस्कार वितरण आणि माहे डिसेंबर शिक्षण परिषदेच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फत्तेपूर येथे मार्गदर्शन करताना ते बोलत होते.


      सुप्रसिद्ध साहित्यिक, शिक्षणाधिकारी (मनपा) तथा शिक्षण विस्तार अधिकारी वाजेगाव व्यंकटेश चौधरी यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील एकमेव बीटस्तरीय शिक्षक भूषण पुरस्कार दरवर्षी वितरित करण्यात येत असतो. यावर्षीदेखील बीटमधील वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या तीन शिक्षिकांना शिक्षक भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. 


             यामध्ये सविता पत्की ( प्राथमिक शाळा वाडीपुयड), प्रणिता आकोशे (प्राथमिक शाळा इंजेगाव), शाहीन बेगम अब्दुल रशीद (उर्दू माध्यम, कें.प्रा शाळा वाजेगाव) या शिक्षिकांना दिलीप बनसोडे, शिक्षणाधिकारी (योजना), अवधूत गंजेवार, (अधीक्षक (शापोआ), केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.

यावेळी तीनही पुरस्कार प्राप्त शिक्षकांची मनोगते झाली. द्वितीय सत्रात शिक्षण परिषदेच्या अनुषंगाने सुलभक अक्षय ढोके यांनी हॅकेथॉन, नवसाक्षर भारत, सीसीई - एचपीसी, शाळाबाह्य विद्यार्थी याबद्दल मार्गदर्शन केले. तर सारंग स्वामी यांनी शैक्षणिक साहित्याचा वापर, अपार आयडी, संचमान्यता याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी प्रशासकीय सूचना देऊन सर्व शिक्षकांना पुढील शैक्षणिक कार्यास प्रेरित केले.


         यावेळी फत्तेपूर शाळेचे मुख्याध्यापक रंगनाथ सोनटक्के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहिनी संगेकर, उपसरपंच मारोती संगेकर, माधव विभुते, शंकर टोकलवाड यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा पटणे यांनी केले. तर आभार गजानन बुळगुंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रंगनाथ सोनटक्के, गजानन बुळगुंडे, अनिता कल्याणकर, वर्षा पटणे, सुनीता मजरे, सतीश कोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थ आणि शाळेच्या वतीने सुरुची भोजनाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)