नासा येवतीकर यांच्या 'कथांजली' पुस्तकाची समग्र शिक्षा आणि पीएमश्री अंतर्गत ग्रंथालय उपक्रमासाठी निवड..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक तथा स्तंभलेखक नासा येवतीकर यांच्या कथांजली या पुस्तकाची समग्र शिक्षा आणि पी. एम. श्री अंतर्गत ग्रंथालय उपक्रमासाठी निवड झाल्याचे  नुकतेच संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी पत्राद्वारे कळविले आहे. 


         सन 2024-25 साठी नांदेड जिल्ह्यातून राज्यस्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी यांनी लिहिलेली निवडक पुस्तके पाठविण्यात आले होते. प्राप्त पुस्तकांची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी राज्यस्तरावर पुस्तक परीक्षण व छाननी समितीद्वारे दोन कार्यशाळाचे आयोजन करून पुस्तकांची छाननी करून प्रथमदर्शनी योग्य असणारी स्तरनिहाय व माध्यमनिहाय पुस्तकांची निवड झाली आहे. त्यात कन्या शाळा धर्माबाद येथील मुख्याध्यापक नासा येवतीकर यांच्या कथांजली या पुस्तकाची इयत्ता सहावी ते आठवी या स्तरासाठी निवड झाली आहे. 


            नासा येवतीकर हे उपक्रमशील शिक्षक असून गेल्या तीस वर्षांपासून ते सातत्याने लेखन करीत आहेत. आजपर्यंत त्यांचे शैक्षणिक विषयावर आधारित वैचारिक लेख, कविता, कथा राज्यातल्या विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहेत. यापूर्वी कन्या शाळेत राबविण्यात आलेल्या काव्यांगण रोज एक कविता या नाविन्यपूर्ण उपक्रमाला राज्यस्तरीय पुरस्कार देखील लाभला आहे. 

              त्यांच्या या पुस्तक निवडी बद्दल डाएटचे प्राचार्य सुदर्शन चिटकूलवार, ग्रंथालय उपक्रमाच्या संयोजिका सौ. मनिषा औंढेकर, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रविशंकर मरकंटे, विस्तार अधिकारी बाबुराव जाधव, केंद्रप्रमुख आबासाहेब उस्केलवार आणि नांदेड जिल्हा समुपदेशक बालासाहेब कच्छवे आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)