इस्त्रो सहलीसाठी जिल्ह्यातून विद्यार्थी रवाना.. ४२ विद्यार्थी व ८ कर्मचाऱ्यांचा समावेश : ८ दिवसांत विविध ठिकाणी भेट देणार

शालेयवृत्त सेवा
0



अहिल्यानगर ( शालेय वृत्तसेवा ) :

         जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व संशोधनाची आवड निर्माण व्हावी, कुतूहल व शोधन वृत्ती निर्माण व्हावी, वैज्ञानिक क्षेत्रात असलेल्या विविध संधींची ओळख व्हावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या ५ वी ते ८ वीतील निवडक ४२ विद्यार्थी डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर (भुंबा, केरळ) येथे शैक्षणिक सहलीसाठी सोमवारी रवाना झाले. 


कशी झाली निवड ?

        जिल्हास्तरीय परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्याचे (पाचवी, सहावी, सातवी व आठवी) निवड चाचणीत गुणानुक्रमे प्रथम पाच असे एकूण १५ विद्यार्थी निवडले. १४ तालुक्यांचे एकूण २१० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातून ४२ विद्यार्थ्यांची निवड केली. यात प्रत्येक तालुक्यातील तिघांचा समावेश आहे.


काय पाहणार ?

■ सहलीमध्ये विद्यार्थी बंगलोर येथील, तर विश्वेश्वरय्या म्युझिअमला भेट देणार आहेत. तसेच डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर (भुंबा, केरळ) येथे रॉकेट लॉचिंग, संग्रहालय पाहणार आहेत.

■ त्रिवेंद्रम येथील प्राणी संग्रहालय व मत्स्यालयाला भेट देणार आहेत. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी मिळणार आहे. 

■ विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक सहल वैज्ञानिकदृष्ट्या मोठी पर्वणीच ठरणार आहे.


       शिक्षणाधिकार पाटील, विस्तार अधिकारी जयश्री कार्ले, केंद्रप्रमुख नरसाळे, वैद्यकीय अधिकारी, तीन शिक्षकांचा समावेश आहे. ज्या शिक्षकांचे सर्वाधिक विद्यार्थी टॉपर होते, त्यांना या सहलीसाठी संधी दिली आहे.

        सोमवारी सकाळी सर्व तालुक्यांतील विद्यार्थी जिल्हा परिषदेत जमले. जिल्हा परिषदेतून बसने ते पुण्याला गेले. दुपारी पुणे विमानतळावरून बंगळुरू येथे जाणार आहेत. बंगळूरू येथील संग्रहालय पाहिल्यानंतर ते बुधवारी इस्त्रोकडे प्रस्थान करतील. तेथे रॉकेट लाँचिंग, संग्रहालय प्राणीसंग्रहालय, तसेच परिसरातील स्थळांना भेटी देणार आहेत.


      सोमवार ते शुक्रवार अशी हा अभ्यास सहलीची रूपरेषा आहे. या वैज्ञानिक स्थळांच्या सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये रूची निर्माण होऊन मदत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)