शैक्षणिक सहलीचे नियोजन करा, एसटीकडून सवलत मिळवा..

शालेयवृत्त सेवा
0


शिक्षण विभागाचे निर्देश पाळणे बंधनकारक


अकोला ( शालेय वृत्तसेवा ) : 

शालेय सहलीसाठी एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात सुमारे ५० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे शाळांकडून ही एसटीलाच पसंती मिळते. यंदाही सवलत कायम आहे. मात्र, ही सहल काढण्यापूर्वी शिक्षण विभागाचे निर्देश संबंधित शाळेला पाळावे लागणार आहे. तरच त्यांना परवानगी मिळते. दुर्दैवाने अपघातासारखी एखादी घटना घडल्यास त्यानुसार जबाबदारी निश्चित केली जाते. साधारणपणे डिसेंबर महिन्यापासून शैक्षणिक सहली निघण्यास सुरुवात होते. एसटी महामंडळाने शालेय सहलीसाठी प्रवास भाड्यात घसघशीत ५० टक्के सवलत जाहीर केलेली आहे. ही सवलत यंदाही कायम ठेवण्यात आलेली आहे. गतवर्षी सहलीच्या माध्यमातून एसटीच्या उत्पन्नात बऱ्यापैकी भर पडली होती. यंदाही या सवलतीचा चांगला फायदा होईल, असे महामंडळाचे म्हणणे आहे.


विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी ५० टक्के सवलत हिवाळा सुरु झाला की, शैक्षणिक यंदाही अनेक शाळांकडून सहलीचे सहली निघण्यास सुरुवात होते. नियोजन करण्यात येऊ लागले आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत कायम आहे. त्यामुळे शाळांकडून एसटी महामंडळाच्या बसलाच प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.


शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी सहलीच्या नियोजनापूर्वी संबंधित शाळेला शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. परवानगी नसेल तर सहल काढता येत नाही. शिक्षणाधिकारीही शाळेकडून सर्व अटींची पूर्तता आली असेल तरच परवानगी दिली जाते.


ट्रॅव्हल्सपेक्षा एसटीलाच पहिली पसंती

एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात ५० टक्के सूट दिली आहे. त्यामुळे शाळा एसटीलाच पसंती देतात. खासगी बस अशा स्वरूपाची सूट देत नाहीत. सोबतच बसची अवस्था, सोयीसुविधांचा ही विचार केला जातो.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)