महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर

शालेयवृत्त सेवा
0

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या विविध संवर्गांच्या पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूर कार्यालयात या मुलाखती घेण्यात येतील.



तालुका क्रीडा अधिकारी

तालुका क्रीडा अधिकारी संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या चाळणी छाननीअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक ५ व ६ डिसेंबर, २०२४ रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.

इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब

इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या छाननीअंती मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २८ नोव्हेंबर, २०२४ तसेच दिनांक ३ व ४ डिसेंबर, २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.

प्राध्यापक क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (गट-अ)

विविध संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या छाननीअंती,चाळणीअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २७ व २८ नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत आयोगाच्या सीबीडी बेलापूर, नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत

प्राध्यापक, क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ ची मुलाखत दि.२७ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात येतील.

सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ,ची मुलाखत दि.२७ नोव्हेंबर, २०२४, सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (धाराशिव)ची मुलाखत दि.२७ नोव्हेंबर, २०२४,

सहयोगी प्राध्यापक, नेत्रशल्यचिकीत्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (नंदुरबार)ची मुलाखत दि. २७ नोव्हेंबर, २०२४

सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (परभणी)ची मुलाखत दि.२७ नोव्हेंबर, २०२४

सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ ची मुलाखत दि.२७ व २८ नोव्हेंबर, २०२४

सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, परभणी गट- अ ची मुलाखत दि.२७ व २८ नोव्हेंबर, २०२४

राध्यापक, विकृतीशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ सिंधुदुर्ग ची मुलाखत दि.२८ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात येतील.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)