राज्यातील शाळांत अपार दिवस साजरा करा

शालेयवृत्त सेवा
0

 



विद्यार्थी नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) : 

केंद्र शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला ३० नोव्हेंबरपर्यंत अपार आयडी उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.  अपार आयडी उपलब्ध होत असून २९ व ३० नोव्हेंबर अपार आयडी दिवस म्हणून साजरे करावेत, अशा सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.

    गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित शाळांतील मुख्याध्यापकांकडून कार्यवाही सुरू आहे. 


...अन्यथा शाळांवर कारवाई


      सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अपार आय डी. यु-डायस व आधार व्हॅलिडेशनचे काम तत्काळ पूर्ण करावे. पुढील दोन दिवसांत मुख्याध्यापकांनी व्यक्तिशः लक्ष घालून याबाबत कार्यवाही करावी. मात्र या सूचनांना ज्या शाळा प्रतिसाद देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही एका पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

     शासनाकडून याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही पूर्ण व्हावी, यासाठी २९ व ३० नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अपार दिवस साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

       या दोन दिवशी अपार आयडी बनविण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहीम राबवावी. तसेच पालिका अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून कार्यवाहीचा आढावा घ्यावा. अशाही सूचना दिल्या आहेत.

+

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)