महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडेल तर दहावीच्या परीक्षेसाठी 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 हा कालावधी निश्चित करण्यात आला असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी स्पष्ट केले आहे.हे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर तुम्ही पाहू शकता.
इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित केली जाईल.तर इयत्ता दहावीची परीक्षा शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च २०२५ दरम्यान आयोजित केली जाणार आहे. तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा सोमवार दि. ३ फेब्रुवारी २०२५ ते गुरुवार दि. २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
याबरोबरच इयत्ता बारावी व्होकेशनल अभ्यासक्रमासाठीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येईल.
दहावीचे वेळापत्रक
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .