केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी'
नागपूर ( शालेय वृत्तसेवा ) :
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी' अंतर्गत प्राथमिक, महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे 'अॅटोमेटेड पर्मनंट अॅकेडमिक अकाउंट रजिस्ट्री आयडी' म्हणजे ‘अपार' आयडी काढण्यात येणार आहेत. यासाठी देशभरातील शाळांमध्ये अपार आयडी काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांची नर्सरी ते संपूर्ण शिक्षणाची जन्मकुंडलीच तयार होणार आहे. हा आधार सारखाच कायमस्वरूपी शैक्षणिक आयडी असणार आहे. पालकांमध्ये संभ्रम असला तरी फार्म भरणे बंधनकारक आहे.
'अपार' APAAR
'अपार' आयडी म्हणजे काय? अपार आयडी म्हणजे 'अॅटोमेटेड पर्मनंट अॅकेडमिक अकाउंट रजिस्ट्री आयडी' होय. हे विद्यार्थ्यांचे १२ डिजिटचे ओळखपत्रच असेल. संबंधित विद्यार्थी नर्सरीपासून ते पीजीपर्यंत किंवा त्यासमोर काय शिकला, काही अतिरक्त डिप्लोमा, डिग्री, कौशल्य प्रशिक्षण, इतर परीक्षा दिली आहे का, याची संपूर्ण माहिती या डिजिटल आयडीमध्ये समाविष्ट असेल.
वन नेशन, वन स्टुडंट आयडी अभियान
भारतीयांच्या आधार कार्डमध्ये ज्याप्रमाणे नागरिकांची इत्थंभूत माहिती असते, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल प्लॅटफार्मवर संग्रहित व संरक्षित करण्यासाठी 'वन नेशन, वन स्टूडंट आयडी' अभियान केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरु केले आहे. हे अभियान नवीन शिक्षण धोरणाचाच एक भाग आहे.
कार्ड मिळणार, लॉगइन करता येणार आधार कार्डप्रमाणेच विद्यार्थ्यांना अपार 'आयडीचा कार्ड मिळेल. त्यासोबत एक पासवर्डही दिले जाईल. १२ अंकी आकड्याद्वारे विद्यार्थ्याला लॉगइन करता येईल व पासवर्ड टाकून त्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीची इत्यंभूत माहिती एक क्लिकवर मिळेल.
शिक्षण, घर, शाळा, निकाल क्लिकवर कळणार अपार आयडी काढताना विद्यार्थी व त्याचे पालक यांचे आधार कार्ड तसेच, घराचा पत्ता सादर करायचा आहे. त्याद्वारे अपार आयडी तयार होईल. पुढे कधीही विद्यार्थ्याने आपल्या अपार आयडीद्वारे लॉगइन केले तर एका क्लिकवर विद्यार्थ्यांचा घराचा पत्ता, त्याची शाळा, त्याचा निकाल, त्याच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती मिळेल.
नोकरीतही 'अपार' आयडी हे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बँक असेल, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बालवाडी किंवा नर्सरीपासून ते पूर्ण शिक्षणापर्यंतचे 'क्रेडिएन्स' म्हणजे क्रेडिट जमा होईल. त्यांच्या प्रत्येक वर्गाचे क्रेडिट असेल. याशिवाय विद्यार्थ्याने वेगळी पदवी किंवा पदविका घेतली असेल, कौशल्य प्रशिक्षण घेतले असेल, कोणतीही परीक्षा देताना अपार आयडी भरावा लागेल व त्याचेही क्रेडिट अकॅडमिक बँकमध्ये जमा होईल. या क्रेडिटनुसार विद्यार्थ्याला नोकरी मिळणे सोपे होईल, असे सांगितले जात आहे.
मदत करणार
फाइल घेऊन नाही फिरायचं, 'डिजीलॉकर' उघडायचं! आतापर्यंत पुढच्या वर्गात किंवा शाळेत प्रवेश करताना किंवा नोकरीच्या मुलाखतीला जाताना तुमच्या कागदपत्रांची फाइल घेऊन फिरावे लागते. अपार आयडीनंतर अशी फाइल घेऊन फिरण्याची गरज पडणार नाही. तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉपमध्ये एका क्लिकवर 'डिजिलॉकर' उघडून तुमची सर्व शैक्षणिक माहिती सादर करता येईल.
आधार अपार लिंक करणार. .
हे अपार आयडी पुढे विद्यार्थ्याच्या आधारशी लिंक होणार आहे. अपार आयडी हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सद्यस्थितीत माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यार्थ्यांचा प्राधान्याने अपार आयडी तयार करावयाचा आहे. शाळाप्रमुख या नात्याने मुख्याध्यापकांनी वन डे वर्क प्लॅन करून पालक यांचे सहकार्याने १०० टक्के कार्यवाही तत्काळ अनुसरावी.
- रोहिणी कुंभार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, नागपूर
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .