मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत लातूर विभागातून नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील विष्णुपुरी जिल्हा परिषद शाळेला प्रथम क्रमांकाचे 21 लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. मुंबईतील जमशेद भाभा थिएटर नरिमन पॉईंट येथे झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे आणि प्रधान सचिव आय ए कुंदन यांच्या उपस्थितीत या पारितोषकाचे वितरण करण्यात आले.
विजेता शाळेच्या सन्मानार्थ शिक्षण अधिकारी प्राथमिक सविता बिरगे, शालेय समिती अध्यक्ष विलास देशमुख, मुख्याध्यापक उज्वला जाधव, पर्यवेक्षक शिवाजी वेद पाठक, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव हंबर्डे, शंकर हंबर्डे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शाळेचे शिक्षक उदय हंबर्डे, कृष्णा बिरादार, डिके केंद्रे, एम ए खदीर, कांचनमाला पटवे, चंद्रकला ईदगावे, संतोष देशमुख, अर्चना देशमुख यांनी या सन्माननांचे स्वीकार केला.
या यशाबद्दल आमदार मोहनराव हंबर्डे, ग्रामपंचायत विष्णुपुरीच्या सरपंच संध्या हंबर्डे, उपसरपंच अर्चना हंबर्डे तसेच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे .
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .