• 19 ऑक्टोबर मतदार बनण्याची शेवटची तारीख
• अर्ज क्र. 6 भरा आजच ऑनलाईन-ऑफलाईन अर्ज करा
• 1 ऑक्टोबर 2024 ला 18 वर्ष पूर्ण झालेले तरुणही पात्र
• मतदार यादीत आजच आपले नाव तपासून घ्या
• ऑनलाईन माहिती घेता येते, ऑफलाईनही माहिती मिळते
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होत आहे. या निवडणूकीत मतदान करण्यासाठी आपण मतदार यादीत नसाल तर पुढची दोन दिवस तुम्हाला संधी आहे. 19 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. 19 ऑक्टोबर पर्यंत आपण मतदार होऊ शकता. यासाठी वोटर हेल्पलाइन ॲप, वोटर्स डॉट इसीआय डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाइटवर आपण ऑनलाइन अर्ज क्र ६करू शकता. तसेच मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयात जाऊन मतदार होऊ शकता. यासंदर्भात 1800-22-1950 या हेल्पलाइनची मदत घेऊ शकता.
मतदानाची अंतिम यादी पुर्ण करण्याची तारीख ही नामांकन प्रक्रिया होईपर्यंत सुरू असते. त्यामुळे ज्या मतदारांनी आपल्या नावाची नोंद केली नाही त्या सर्वांनी आपली नावे पुढील दोन दिवसात मतदार यादीत समाविष्ट होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
1 ऑक्टोबर 2024 पर्यंत वयाचे 18 वर्ष पूर्ण केलेले तरूणही मतदार होण्यास पात्र आहेत. त्या सर्वांनी आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जम्मू काश्मीर सारख्या आतंकवादी कारवाया सुरू असणाऱ्या राज्यामध्ये मोठ्याप्रमाणात विधानसभेसाठी मतदान झाले मात्र नांदेड सारख्या सुशिक्षितांच्या जिल्ह्यामध्ये केवळ 61 टक्के मतदान गेल्या लोकसभा निवडणुकीत झाले आहे. त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येकाचे मतदान होईल याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
आपले मतदान कुठे शोधून ठेवा
ऐन निवडणुकीच्या दिवशी आपले मतदान यादीत नाव नसल्याचा शोध अनेकांना लागतो. आपले मतदान केंद्र बदले असल्याचे कळते. मात्र यासंदर्भात प्रत्येक नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करणे, मतदार यादी बद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. मात्र अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक 20 नोव्हेबरला होत आहे. आपल्या मोबाइलवर वोटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करून आपणास याबाबतची माहिती मिळू शकते. तसेच वोटर्स डॉट इसीआय डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाइटवर आपण तपासणी करू शकता. घरातील तरुणांनी ज्येष्ठांनाही यासंदर्भात मदत करावी. आपल्या घरातील पात्र मतदारांची नावे कुठे आहेत हे तपासून घ्यावीत,असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
000000
Chief Electoral Officer Maharashtra Maharashtra DGIPR Abhijit Raut
#विधानसभानिवडणूक२०२४
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .