राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा . . बालदिनी निकाल. . विजेत्यांना पारितोषिक

शालेयवृत्त सेवा
0

 





नाशिक ( शालेय वृत्तसेवा ) :

         शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था, आशेवाडी, तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, सुंदर, सुबक चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कलेला उत्तेजन देणे, त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आणणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कलाकार वृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे.

अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी)

ब गट (इयत्ता सहावी ते दहावी) 

क गट (इयत्ता अकरावी ते पदवी) 

ऑनलाइन चित्रकला स्पर्धेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी

https://shikshakdhyey.co.in 

या संकेतस्थळाला भेट द्यावी.


दिलेल्या विषयांपैकी फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे. चित्र पूर्ण झाल्यानंतर ते रंगवून त्या चित्राचा मोबाईलमध्ये एक छानसा फोटो काढायचा आहे. तो फोटो आम्हाला आपल्या माहितीसह 9623237135 या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवायचा आहे. 

रंगविलेले चित्राचा फोटो जमा करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे.


तीनही गटातील उत्कृष्ठ चित्रांना पारितोषिक दिले जाईल. त्यात सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि प्रिंट प्रशस्तीपत्र (सर्टिफिकेट) आणि शिक्षक ध्येयचे ५१+ डिजिटल अंक यांचा समावेश आहे.

 तसेच या स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे ५१+ डिजिटल अंक देण्यात येईल.

           राज्यातील मुख्याध्यापक तसेच चित्रकला शिक्षक यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेविषयी सविस्तर माहिती द्यावी आणि सकारात्मक विचारसरणी ठेऊन या स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ यवतमाळ, रामशेज शिक्षण संस्था, आशेवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक आणि शिक्षक ध्येयचे मधुकर घायदार, नाशिक, प्रभाकर कोळसे, वर्धा, डी. जी. पाटील, नंदुरबार आणि कांबळे एस. जी पाटोदेकर, लातूर यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)