माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत नांदेडचे यश

शालेयवृत्त सेवा
0

 



लातूर विभागातून विष्णुपुरी प्रथम तर नांदेड तालुक्यातून ब्राम्हणवाडा प्रथम


नांदेड (शालेय वृत्तसेवा ) :

        शालेय स्तरावर लोकसहभातून शैक्षणिक व भौतिक सुधारणा  व्हावी जिल्हा परिषदेच्या शाळा खाजगी शाळांच्या स्पर्धेत उतराव्यात हे लोकाभिमुख धोरण ठरवून 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान' गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र शासन राबवत आहे. या अभियानात नांदेड जिल्ह्यातील १००% शाळांनी सहभाग नोंदवला होता. 

         जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली  'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियानांतर्गत पंचायत समिती नांदेड तालुक्यातील विभागातून जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरीने लातूर विभागातून प्रथम क्रमांक पटकावला असून या शाळेला मुंबई येथे २१ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. 



         तर या अभियानात नांदेड तालुक्यात प्रथम येण्याचा मान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या विभागातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा या शाळेने मिळविला असून, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तरोडा द्वितीय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीवाडी (तृतीय), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळेश्वर (तृतीय) तर खाजगी विभागातून शाकुंतल इंटरनॅशनल पासदगाव(प्रथम), इकरा इंटरनॅशनल गाडेगाव (द्वितीय), सांदीपनी पब्लिक स्कूल तरोडा (तृतीय) क्रमांक पटकावला आहे. 

          याबदल जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप बनसोडे, गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे, शिक्षणाधिकारी मनपा व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी शिंदे, रुस्तुम आडे, माधव दूधमल, लता कौठेकर, व्यंकट पाटील, केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड, बाळासाहेब मटके निरंजन भारती, मारोती घोडजकर, माधव धोंडगे, शंकर मठपती, राहुल गायकवाड, विकास मोरे आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)