शालेय अभ्यासक्रमात आता व्यावसायिक शिक्षण | Vocational education now in school curriculum

शालेयवृत्त सेवा
0

 



शालेय अभ्यासक्रमात आता सातवी, आठवीपासून आता व्यावसायिक शिक्षण !

मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

         नवीन अभ्यास आराखड्यानुसार शाळांमध्ये ७ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यात विद्यार्थ्यांना सुतारकाम, इलेक्ट्रिकल काम, बागकाम, मातीची भांडी बनवण्याची कला आदी विषय शिकवले जाणार आहेत. त्यासाठी या विद्यार्थ्यांना थेट संबंधित कारागिरांच्या कार्यशाळेला भेट देण्याचा उपक्रमही राबवला जाणार आहे. कारागिरांशी संवादातून या व्यवसायांबद्दल व्यावहारिक माहिती मिळण्यास मदत होईल. दर आठवड्याला या विषयांचे वर्ग सुरू केले जाणार असून प्रत्येक वर्ग ३५ ते ४० मिनिटांचा असेल.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)