सीटीईटी परीक्षेच्या तारखेत बदल | Change in CTET Exam Date

शालेयवृत्त सेवा
0


सीटीईटी परीक्षेच्या तारखेत बदल

१४ डिसेंबरला होणार परीक्षा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) डिसेंबर महिन्यांत आयोजित सीटीईटी २०२४ परीक्षेच्या तारखेत बदल केला आहे. सीबीएसईच्या संकेतस्थळावरील प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी प्रशासकीय कारणामुळे दि. १ डिसेंबर रोजी  होणाऱ्या परीक्षेचे १५ डिसेंबर रोजी आयोजन केले होते. त्यात पुन्हा बदल . केला असून आता सीटीईटी परीक्षा १४ डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे.


देशातील काही राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये दि. १५ डिसेंबर रोजी स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले आहे अशी माहिती अनेक उमेदवारांकडून प्राप्त झाली होती. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे हित लक्षात घेता सीटीईटी परीक्षेचे शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी आयोजन केले जाणार आहे. तसेच एखाद्या शहरात उमेदवारांची संख्या जास्त असल्यास दुसऱ्या दिवशी दि. १५ डिसेंबर रोजी सीटीईटी परीक्षा आयोजन केले जाऊ शकते असा निर्णय घेण्यात आला आहे.

सीबीएसईद्वारे दोन सत्रांमध्ये पेपर दोनची परीक्षा सकाळी साडेनऊ ते दुपारी बारा तसेच पेपर एकची परीक्षा दुसऱ्या सत्रात दुपारी अडीच ते पाच या वेळेत होणार आहे. सीटीईटी डिसेंबर २०२४ साठी प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून येत्या १६ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे सीटीईटी देऊ इच्छिणाऱ्यांनी अर्ज प्रक्रिया करावी, असे आवाहन केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)