केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3 टक्के DA वाढ
नवी दिल्ली ( शालेय वृत्तसेवा ) :
दिवाळी सणाच्या आधी भारत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली असून महागाई भत्त्यात डीए तीन टक्क्याची वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 53 टक्क्यावर गेला आहे. देशभरातील एक कोटी पेक्षा जास्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना यांचा लाभ होईल. वाढीव महागाई भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने एक जुलैपासून अमलात येणार असल्याचे मंत्री वैष्णव यांनी नमूद केले. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त धारकांना सध्या 50% महागाई भत्ता मिळतो याआधी मार्च महिन्यात सरकारने महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली होती .
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .