उपक्रमशील शिक्षक मिलिंद जाधव यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान !

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

          राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शिक्षणमंत्री ना.दिपक केसरकर व मान्यवरांच्या हस्ते नांदेड जिल्हा परिषद अष्टपैलू व उपक्रमशिल शिक्षक मिलिंद पुंडलिकराव जाधव यांना शिक्षक दिनी मुंबई येथे प्रदान करण्यात आला.

        मिलिंद पुंडलिकराव जाधव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा भोकर जिल्हा नांदेड येथे विषय शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले असून त्यांची एकूण सेवा एकविस वर्ष झालेली आहे. त्यांनी अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञान आयसीटी व अध्यापन पद्धतीचा वापर केलेला आहे. 

        कला संस्कृती व इतिहास विषयावर लेख प्रकाशन करून सहा ग्रंथाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. दीक्षा ॲप आणि इंटरटेनमेंट स्टार्स प्रकल्पात कोर्स निर्मिती इत्यादी साहित्य निर्मिती आहे. राज्यस्तरावर सुलभक मार्गदर्शक म्हणून त्यांनी कार्य केले. शैक्षणिक साहित्याची निर्मिती सुद्धा त्यांनी केलेली आहे.

        चित्र प्रदर्शने हस्तकला निर्मिती वारली अजिंठांचे शेकडोचित्र रेखाटन त्यांनी केलेले आहेत. विज्ञानाचे कृतीयुक्त अध्यापन करतांना शेकडो प्रात्यक्षिकांची युट्युब वर नोंद त्यांनी केलेली आहे. वाचन व चळवळीसाठी बाल वाचनालय लेखन कार्यशाळेचे आयोजन सुद्धा त्यांनी केले. नाविन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी व आखणी त्यांनी केली. तसेच रक्तदान, मतदान, जनजागृती, पर्यावरण रक्षण वृक्ष संवर्धनाचे अखंडित कार्य त्यांनी केलेले आहे.

         त्यांच्या या कामाचे फलित म्हणून त्यांना यावर्षीचा ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. मिलिंद जाधव यांना राज्य शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, योजना शिक्षणाधिकारी डी आर बनसोड, भोकरचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि शिक्षकाने अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)