महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

शालेयवृत्त सेवा
0

 



नवी दिल्ली ( शालेय वृत्तसेवा ) :

             शिक्षण क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या आणि नव्या प्रयोगातून आपले योगदान देणाऱ्या 50 शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविले जाणार आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील मंतैया बेडके जिल्हा गडचिरोली आणि सागर बागडे जिल्हा कोल्हापूर या दोन शिक्षकांचा देखील गौरव करण्यात येणार आहे.

          केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी देशभरातील 50 शिक्षकांची निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जाजावाडी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैया बेडके आणि कोल्हापूरच्या एसएम लोहिया हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील चित्रकला शिक्षक सागर बागडे यांचा समावेश आहे. मंतैया बेडके यांनी गडचिरोलीच्या दुर्गम व नक्षत्र भागात शाळेची पटसंख्या ८ वरून १३८ पर्यंत वाढवले आहे. तसेच लोकसभागातून शाळेत स्मार्ट टीव्ही आणि इन्व्हर्टर सारख्या सुविधा आणल्या आहेत. सागर बागडे यांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल गौरविण्यात येत आहे.

          राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबरला दिल्लीतील विज्ञानभावनात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सर्व शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि रोख ५० हजार रुपये आणि रौप्य पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)