कलावंत शिक्षकांच्या "गीत गुंजन " कार्यक्रमास उदंड प्रतिसाद..

शालेयवृत्त सेवा
0

 



अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचा उपक्रम !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा  ) : 

किनवट येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयातील सभागृहात अखिल भारतीय शिक्षक साहित्य , कला व क्रीडा मंडळ मराठवाडा विभागाच्या वतीने खास शिक्षकांसाठी कराओके गीत गायनाचा "गीत गुंजन " कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास कलावंत शिक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

      कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलतांना शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड असे म्हणाले की , संगीत हे असे औषध आहे त्यामुळे दुःख-वेदना दूर होतात. कलावंत शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये रमून जातो. म्हणून शिक्षकांनी आपली आवड जोपासली पाहिजे. शिक्षकांना हा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे मी कौतुक करतो. 

        याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे मानव विकास कार्यक्रम समन्वयक तथा स्तंभलेखक उत्तम कानिंदे, सेवानिवृत्त शिक्षक कलावंत वार्ताहर अनिल भंडारे उपस्थित  होते. मराठवाडा विभाग प्रमुख रमेश मुनेश्वर यांनी प्रास्ताविक व नांदेड जिल्हासचिव रुपेश मुनेश्वर यांनी सूत्रसंचालन केले.  मराठवाडा विभाग सचिव शेषराव पाटील यांनी आभार मानले.

         यावेळी  आंतरराष्ट्रीय चित्रकार रणजीत वर्मा, किनवट तालुकाध्यक्ष रामस्वरूप मडावी, माहूर तालुकाध्यक्ष मिलिंद कंधारे, प्राचार्य वसंत राठोड, संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्या आम्रपाली वाठोरे आदीसह अनेक शिक्षक- शिक्षिका उपस्थित होते. मराठी हिंदी चित्रपटगीते, देशभक्ती गीते, भावगीते, भक्तीगीते अशा एकापेक्षा एक सरस गीत गायनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. सहभागी सर्वांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर येथील शालेय पोषण आहार कामगाराचा मुलगा आदर्श साहेबराव वाढवे यांची वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी पहिल्याच फेरीमध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.

       कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उत्तम कानिंदे यांनी शिक्षकांना गीत गायनासाठी आधुनिक स्टुडिओ उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले. यावेळी गीतगुंजन कार्यक्रमात मुन्ना थोरात, आम्रपाली वाठोरे,  सुभाष पडलवार, मिलिंद खंदारे, सतीश राऊत, चंद्रकांत मोरे, उल्हास सुदेगुणेवार, रुपेश मुनेश्वर, दत्ता शेवाळकर, गणेश येरकाडे, रमेश पडगिलवार, संजय जाधव, कुणाल राठोड, सुधाकर नरोटे, बालाजी इंदुरकर, वसंत राठोड, अनिल भंडारे, रणजीत वर्मा, प्रवीण वाघमारे, कामराज माडपेलिवार, गंगाधर कदम, आत्मानंद सत्यवंश, शेख अकबर, रामस्वरूप मडावी, शेषराव पाटील, रमेश मुनेश्वर, शिवशंकर स्वामी, दिलीप कोसले, दीपक डंबाळे, प्रशांत घोडके, साहेबराव वाढवे, भीमराव पाटील, नामदेव डवरे, विश्वास पाटील, गुरुलिंग वाळके, दयाल मोगरकर , चंद्रशेखर शेन्डे आदी शिक्षक कलावंतांनी उपस्थित राहून बहारदार गीते सादर केली.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)