नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
हिमायतनगर शिक्षण विभाग पंचायत समिती व स्व.पंजाबराव पाटील जवळगावकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणा मंगल कार्यालय हिमायतनगर येथे दि.२६/०९/२०२४ रोजी तालुकास्तरीय गुरुगौरव सोहळा २०२४ नुकताच पार पडला.
या गुरुगौरव सोहळ्यात हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कुल जवळगाव येथील हरहुन्नरी विषय शिक्षक चंद्रकांत देवराव कदम यांना शिक्षण विभाग,पंचायत समिती,हिमायनगर तर्फे सन २०२३- २४ साठीचा तालुकास्तरीय गुरुगौरव पुरस्कार हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा.श्री.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या प्रसंगी तहसीलदार मा.पल्लवी टेमकर, गटविकास अधिकारी मा.प्रल्हाद जाधव,गटशिक्षणाधिकारी मा.केशव मेकाले,शिक्षण विस्तार अधिकारी मा.अरुण पाटील व मान्यवर उपस्थित होते.सरांच्या सोबत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.वैशाली कदम व ज्येष्ठ बंधू पत्रकार संभाजी देवराव कदम लगळूदकर,शिक्षक वृंद जवळगाव व मित्रपरिवार उपस्थित होता.
चंद्रकांत कदम सर उचशिक्षित असून त्यांचे विद्यार्थी NMMS व स्कॉलरशीप सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने शिष्यवृत्तीधारक होत असतात. तसेच "समतेच्या डोहाकाठी" हा त्यांचा मराठी गझलसंग्रह मराठी साहित्यात प्रसिद्ध आहे. "सन्मित्र" नावाने ते आशयघन मराठी गझललेखन करतात.अनेक गझल मुशायरे,संमेलने व गझल कार्यशाळांमधून गझलांचे बहारदार सादरीकरण व नवोदितांना गझल साक्षर करण्याचे कार्य निस्वार्थीपणे करत असतात.त्यांचे सर्वांगीण कार्य व गुरुगौरव पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .