बारावी परीक्षेचे अर्ज १ ऑक्टोबरपासून
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १ ते ३० ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहे . राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे .
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे अर्ज भरणाऱ्यांसाठी २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला असून ,बारावी परीक्षेसाठी १ ऑक्टोबरपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करण्याची ३० ऑक्टोबर ही शेवटची तारीख असणार आहे . त् विद्यार्थ्यांना या कालावधीमध्ये नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे
■ कागद महागल्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात ५० रुपये वाढ करण्यात आली आहे ■ दहावीचे परीक्षा शुल्क ४२० रुपये होते, ते आता ४७० रु ■ बारावीचे परीक्षा शुल्क ४४० रुपये होते, आता ते ४९० रु■ परीक्षा शुल्कासह प्रशासकीय, गुणपत्रिका, प्रमाणपत्र शुल्क आणि प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कातही वाढ करण्यात आली आहे
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्यामार्फत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची नोंद असणे आवश्यक असणार आहे. सरल प्रणालीद्वारेच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सरल प्रणालीबाबत माहिती घेऊन विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेत अर्ज करणे अनिवार्य आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .