प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर जिल्ह्यातील 1138 शिक्षकांना निवड श्रेणी बहाल

शालेयवृत्त सेवा
0

 



महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुरावाला यश..


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

        नांदेड जिल्हा परिषदेमध्ये मागील विस ते पंचविस वर्षांपासून प्रलंबित असणारा निवड श्रेणीचा प्रश्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने वेळोवेळी लावून धरला होता. दिनांक 15 मार्च 2024 रोजी निवड श्रेणी आदेश निकाली नाही काढल्यास 1 एप्रिल 2024 रोजी जिल्हा परिषदे सोबत ढोल बाजे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने देण्यात आला होता. त्याची दखल घेतल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा नांदेड कडून मुकाअ मिनल करणवाल यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

          लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रशासनाने "ढोल बाजे आंदोलन करण्यात येऊ नये" लवकरच हा प्रश्न निकाली काढण्यात येईल असे लेखी आश्वासन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला दिले होते. त्यानंतरही शिक्षक परिषदने सातण्याने निवडश्रेणी विषय लावून धरला होता. प्रशासना सोबतच पालकमंत्री ना.गिरीश महाजन साहेब,माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब तसेच मुकाअ मिनल करनवाल मॅडम, शिक्षणाधिकारी सौ सविता बिरमे मॅडम यांना वेळोवेळी भेटून मागणी केली होती.त्यानुसार आज जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम यांनी जिल्ह्यातील 24 वर्षे सेवा झालेल्या पात्र 1138 शिक्षकांना "निवड श्रेणी लागू करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.

           जिल्ह्यातील दिर्घ प्रलंबित असणारा निवडश्रेणीचा विषय मार्गी लावल्या बद्दल मा.मिनल करणवाल मॅडम, उप मुकाअ राजकुमार मुक्कावार, शिक्षणाधिकारी सौ सविता बिरगे मॅडम, उपशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांच्या सह याकामी योगदान देणाऱ्या यंत्रनेतील सर्व घटकांचे म रा शिक्षक परिषदेच्या वतीने राज्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, संघटनमंत्री सुरेश दंडवते, राज्यप्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष डी एम पांडागळे, मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे, उपाध्यक्ष अजित केंद्रे, शाम रायेवार, जिल्हा नेते संभाजी आलेवाड , जिल्हा कार्यवाह दिगंबर पाटील कुरे,जिल्हा कार्याध्यक्ष नरसिंग एंड्रलवार,जिल्हा कोषाध्यक्ष बालाजी पामपटवार, जिल्हा प्रवक्ता राजेंद्र पाटील, संपर्कप्रमुख संतोष साखरे ,व्यंकट गंदपवाड, प्रसिद्धी प्रमुख महेश पाटील, विठ्ठल मुखेडकर सह सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

   

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)