कवी व्यंकटेश चौधरी यांच्या 'एक शून्य प्रतिक्रिया ' काव्यसंग्रहाची विद्यापीठ अभ्यासक्रमात निवड

शालेयवृत्त सेवा
0

  



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

         येथील शिक्षण विस्तार अधिकारी तथा कवी व्यंकटेश चौधरी यांच्या 'एक शून्य प्रतिक्रिया' या दुसऱ्या काव्यसंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एमए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. 

          'एक शून्य प्रतिक्रिया' हा काव्यसंग्रह शब्दालय प्रकाशन या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला असून प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी या संग्रहाचे मुखपृष्ठ चितारले आहे. श्री व्यंकटेश चौधरी यांचा यापूर्वी बहुचर्चित 'गंधबन' हा काव्यसंग्रह निर्मल प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित झाला होता. यापूर्वीही त्यांच्या कविता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात निवडलेल्या होत्या.

              चौधरी यांचे 'मन्याडीच्या कुशीत' हे ललित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अभ्यासासाठी होते. चौधरी यांनी लालबहादूर शास्त्री आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे कुमार चरित्र लिहिले आहे. लालबहादूर शास्त्री या कुमार चरित्राच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. शिक्षकांच्या विविध संग्रहाचे संपादन, दिवाळी अंकाचे संपादन आदी साहित्यिक योगदानाची यादी त्यांच्या नावावर आहे. चौधरी यांचा काव्यसंग्रह विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)