रिप बेनिफिट या संस्थेच्या सहभागातून नांदेड जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाचे चळवळ
नांदेड (शालेय वृत्तसेवा) :
दैनंदिन जीवनातील प्लास्टिकचा वापर आणि सगळीकडे आढळणारा कचरा हा आरोग्य आणि पर्यावरणासाठी घातक असून पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक व्यक्तीने जबाबदार आणि पर्यावरण पूरक वातावरण वातावरण निर्माण करायला हवे. शाळांमधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे शिक्षण प्रभावीपणे देता येईल त्यासाठी रिप बेनिफिट या संस्थेच्या सहभागातून नांदेड जिल्ह्यात एक सशक्त चळवळ उभी करण्यात येत असल्याचे मत नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी आज व्यक्त केले.
रिप बेनिफिट या संस्थेच्या सहभागातून नांदेड जिल्ह्यातील दोनशे शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांचा पर्यावरणीय संरक्षण नागरिकता सहभागाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. परिवर्तनाच्या लढाईत ज्या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे त्यांना 'नांदेडचे निंजा ' हे संबोधन वापरण्यात येणार असून शाळा व गाव पातळीवर स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचे काम प्रत्यक्ष समस्याचे आकलन व कृती मधून करण्यात येणार आहे. दिनांक पाच व सहा ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक प्रशिक्षणात निवडक 200 शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
रीप बेनिफिट या संस्थेचे संवाद विभाग प्रमुख श्रीमान तलपात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय उत्पत्ती, भारत बंसल, चंद्रिका शिवानी, यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले व वैविध्यपूर्ण मांडणीतून शिक्षकांना खिळवून ठेवले. प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर व योजना शिक्षण अधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांनी आयोजना मागची भूमिका विशद करून शिक्षकांना प्रोत्साहित केले.
यावेळी शिक्षकांनी त्यांच्या शाळा स्तरावर या संदर्भात करण्यात आलेली कामे आणि पुढील कामाची आखणी याबाबत आपली मते मांडली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, शिक्षण विस्तार अधिकारी एस आर पोकले, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. विलास ढवळे यांनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .