नांदेड (शालेय वृत्तसेवा) :
गोविंदेश्वर प्राथमिक शाळा तरोडा बु येथे इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांना दि ८ ऑगस्ट रोजी शालेय दप्तर वाटप करण्यात आले. महिला व बालकल्याण अधिकारी कैलास तिडके यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतील मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप करण्यात आले.
कैलास तिडके यांनी विद्यार्थी व पालकांना शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती व विविध योजना यांची व्यवस्थित मार्गदर्शन केले व विद्यार्थी कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांचा वाढदिवस व शाळेतील विद्यार्थी साईगणेश जाधव आणि रोशनी वानखेडे या विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी केले. त्यांनी शाळेत दिले जाणारे वेगवेगळे उपक्रम योजना यांची माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक सचिव आर. जे. दिग्रसकर यांनी देखील पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण जिल्हाधिकारी परभणी कैलास तिडके उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे युवा उद्योजक अरुण पाटील सुनेगावकर शंकरराव नामवाड हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सूर्यकांत यांनी केले तर आभार प्रदर्शन दिगंबर कल्याणकर यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक संध्या सिंदगीकर, शोभा किडे, सुग्रीव मोरे परिसरातील नागरिक पालक व शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .