नागपर ( शालेय वृत्तसेवा ):
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, यांची देवगिरी नागपूर येथे राष्ट्रीय राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त मंडळाच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी मा. देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेतनवाढ संदर्भात विचार करण्यात येईल असे शिष्टमंडळात सांगितले.
दि. ४ सप्टेंबर २०१४ वर्षोचा दोन वेतनवाढीच्या ऐवजी ठोक रक्कम देणारा जीआर रद्द करण्यात यावा. व सर्व राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी ही विनंती करण्यात आली. राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शासनाच्या वर्ग 1व वर्ग 2 गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात यावी. शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या विविध समितीवर शासकीय सदस्य निवड करण्यात यावी.या बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून मा.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी स्वतः मंत्रालयीन स्तरावर चर्चा करुन विषय सोडविण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी सुनील नायक जिल्हा अध्यक्ष, बळीराम चापले विभागीय सरचिटणीस, जगन्नाथ पोटे विभागीय अध्यक्ष, डॉ.शारदा रोशनखेडे जिल्हा सरचिटणीस, माया गेडाम जिल्हा कोषाध्यक्ष, विजया कोकमवार जिल्हा कार्यकारिणी सदस्या, एकनाथ पवार जिल्हा कार्यकारिणी सदस्य, दिप्ती बिष्ट जिल्हा कार्यकारिणी सदस्या,गजानन कुरवाडे जिल्हा उपाध्यक्ष व इतर पुरस्कार प्राप्त शिक्षक उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .