चला ऑक्सिजन पेरूया.. गजरासह लोणी शाळेची वृक्षदिंडी

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

      किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथे आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपणाचा संदेश देण्यासाठी वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी ऑक्सिजन पेरण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले.

       वारकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषेत ' चला ऑक्सिजन पेरुया.. असे आवाहन करणारी फलक देण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांच्या हातामध्ये वृक्षरोपणाचे संदेश देणारी झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, झाडे लावूया पृथ्वीला वाचऊ या, चला वृक्ष संवर्धन करू या, वृक्ष आपले मित्र.. अशा विविध घोषनामध्ये वृक्षदिंडी गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. गावातील प्रमुख चौकामध्ये रिंगण करून जगण्यासाठी वृक्षांचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.       



          यावेळी  'ऑक्सिजन पेरुया ' चळवळीचे संकल्पक रमेश मुनेश्वर, उपक्रमशील शिक्षिका विद्या श्रीमेवार, पदवीधर शिक्षक अंकुश राऊत, तंत्रस्नेही शिक्षक राहुल तामगाडगे तसेच अंगणवाडी सेविका शोभा गेडाम, नंदाबाई सावरकर आणि गावातील महिला व ग्रामस्थ वृक्षदिंडीत सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)