कृषी दिनानिमित्त शालेय परिसरात केले वृक्षारोपण
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत कमठालाच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कमठाला येथे, जिल्हा निधीतून बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांचे उद्घाटन तसेच शाळेच्या 2 एकर नवीन जागेत आणि स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपन किनवट/माहूर मतदारसंघाचे माजी आमदार मा.प्रदीपजी नाईक यांच्याहस्ते करण्यात आले.
यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने 4-5 फूट उंचीची व एक ते दोन वर्षाची वड,पिंपळ, कडूनिंब, शिसम, नारळ व विविध प्रकारचे वृक्ष,पेरू, चिकू,आंबा यासारखी फळझाडे, इतर शोभेची झाडे अशी 200 देशी-विदेशी झाडे उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कमठाला ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा श्रीमती अनुसयाबाई तडसे यांनी भूषविले. प्रदीपजी नाईक यांनी आपल्या भाषणात शाळेला प्रशस्त जागा,क्रिडांगण ,सीसी रस्ता उपलब्ध करून दिल्याबाबत तसेच अतिशय जुन्या व धोकादायक असलेल्या खोल्यांची पडझड झाल्यामूळे निजामकालीन शाळेसाठी नवीन वर्गखोल्या वेळेत बांधून पूर्ण केल्याबाबत कमठाला ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुसयाबाई तडसे, ग्रामसेवक संतोष ताडेवार व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृ.उ.बा.समितीचे संचालक व माजी सभापती अनिल पाटील क-हाळे, दै.लोकमतचे पत्रकार गोकुळ भवरे, माहूर न.पं.अध्यक्ष फिरोज दोसानी,कृ.उ.बाजार समिती किनवटचे संचालक प्रेमसिंग जाधव, बालाजी बामणे आणि राहूल नाईक , घोटी ग्रा.पं.उपसरपंच राजू पा.सुरोशे, मा.जिपसदस्य प्रविण म्याकलवार, सामाजिक कार्यकर्ते बबन वानखेडे, प्रदीपजी नाईक यांचे अंगरक्षक नितीन कदम तसेच कमठाला येथील तंटामुक्ति समिती अध्यक्ष शिवाजी पाटील क-हाळे, मा.अध्यक्ष लक्ष्मण देवसरकर ,पेसा समिती अध्यक्ष अशोक नैताम ,मारोती गेडाम ,कोहचाडे , शिक्षण समिती अध्यक्ष भारत भरकड ,व ग्रामस्थ बंधु भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी अनिल पाटील क-हाळे व कमठाला ग्रापंचायत उपसरपंच बालाजी पा.भरकड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मा.सरपंच यांचे वतीने मारोती सुरोशे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. वर्गखोल्यांच्या उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळा व स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कमठाला जि.प.केंद्रीय प्रा. शाळा व केंद्राचे मुख्याध्यापक शरद कुरूंदकर,माजी मुख्याध्यापक अंकुश राऊत यांनी प्रयत्न केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .