विविध मागण्यासाठी माध्यमिक शिक्षकांचे एक दिवसीय धरणे आंदोलन

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) : 

         जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकावर सतत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आज राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 

        या राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा एक भाग म्हणून माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज सकाळी 11 ते 5 या वेळात नांदेड जिल्हा परिषद संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील दाचावार यांच्या नेतृत्वाखाली धरणे धरण्यात आले. 

         माध्यमिक शिक्षकांना 10 : 20 : 30 ही आश्वासित प्रगती योजना लागू करणे. आरोग्य विषयक कॅशलेस योजना लागू करणे. एक नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त माध्यमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे. यासह अनेक महत्त्वपूर्ण मागण्यासाठी आयोजित केलेल्या या धरणे आंदोलनात बाबुराव पंडागळे, डॉ. हेमंत कारले, बापूराव चव्हाण, उमाकांत पाचगले, संदीप मस्के, सय्यद शेख, राजेंद्र मुळे, साहेबराव चव्हाण आदीसह अनेक शिक्षक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)