वनवासी माध्यमिक विद्यालय चिंचपाडा शिक्षण सप्ताह अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

         राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत शिक्षण सप्ताह २२ जुलै ते २८ जुलै या अंतर्गत चौथ्या दिवशी नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनवासी विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रेमल पाडवी, प्रमुख अतिथी सौ. रेखा पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद चिंचोले उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. अनिल लोहार यांनी केले स्टेज सजावट श्री. संदीप महाले यांनी केले. साऊंड सिस्टिम श्री. संदीप आहेर, श्री. अशोक पाडवी श्री. राजू गावित. श्री. कांतीलाल वसावे फोटो संकलन केले.

           कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन श्रीमती सुवर्णा चौधरी यांनी केले कार्यक्रमांमध्ये गीत कोळी नृत्य कथाकथन लावणे नाटिका एकांकी असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले व कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)