गुणवंत विद्यार्थी हे शाळेचे वैभव - व्यंकटेश चौधरी

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

       शाळा विकासाबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे जास्त लक्ष द्यावे. भौतिक सुविधा शाळेच्या वाटचालीत महत्त्वाच्या असतातच. परंतु गुणवंत विद्यार्थी हे शाळेचे वैभव असते, असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले.

         आज दि. १५ जुलै रोजी गोविंदेश्वर प्राथमिक शाळा खंडोबा चौक तरोडा बु नांदेड येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती नांदेडचे ज्येष्ठ कवी, साहित्यिक शिक्षण विस्तार अधिकारी  व्यंकटेश चौधरी यांनी मार्गदर्शन करताना वरील मत व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या तर्फे स्वतःची पदरमोड करून सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे गणवेश वाटप करण्यात येतात. तसेच शैक्षणिक साहित्य, वह्या,  दप्तर इत्यादीदेखील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. संस्थेचे संचालक सचिव आर जे दिग्रसकर यांनी देखील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांचे भरभरून कौतुक केले. यावेळी शालेय समिती सदस्य शंकर नामवाड यांची विशेष उपस्थिती होती.

           मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर दिगंबर कल्याणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी कार्यक्रमाला मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर, शिक्षक माधव नामवाड, सूर्यकांत जाधव, दिगंबर कल्याणकर बालाजी गायकवाड, शोभा किडे, संध्या सिंदगीकर व परिसरातील पालक नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)