शिक्षकांची भरतीही सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर

शालेयवृत्त सेवा
0

 


 

मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) : 

       पोलिस भरतीप्रमाणे शिक्षकांचीही भरती सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. आपल्याच जिल्ह्यात शिक्षक म्हणून नोकरी मिळावी यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

       उपाय म्हणून गृह जिल्ह्यातच नोकरी मिळावी म्हणून जिल्हानिहाय शिक्षक भरती केली जाईल असे ते म्हणाले. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांवरून अनेकदा घोळ होतो. या शिक्षकांची सातत्याने बदली होत असल्याने एकाच शाळेवर त्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही. म्हणून या शिक्षकांच्या बदल्या न करण्याचे धोरण लवकरच स्वीकारले जाईल, असे केसरकर यांनी सांगितले. ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील खासगी शाळांना त्या गावाची नगर पंचायत झाल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येतात. या अडचणी आता दूर केल्या जातील, त्यासाठीचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असे ते म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)