शिक्षण सप्ताहाच्या विद्यांजली तिथी भोजनाची लागली शिक्षकांना चिंता !

शालेयवृत्त सेवा
0


दानशूर यांना मदतीचे आवाहन ; प्रसंगी शाळांनाच करावा लागणार खर्च 

छत्रपती संभाजीनगर (शालेय वृत्तसेवा) :

           केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्यात 22 ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत रविवारी तारीख 28 समुदाय सहभाग दिवस म्हणून तिथी भोजन  उपक्रम राबविण्यात येणार आहे. या स्नेहभोजनाची जबाबदारी त्या त्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांवर सोपविण्यात आले आहे त्यामुळे आता शिक्षकांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. 

          स्नेहभोजनाच्या उपक्रमांतर्गत स्नेहभोजन देण्याकरता गावातील दानशूर व्यक्ती लोकप्रतिनिधी विविध सामाजिक संस्था आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना आवाहन करण्यात यावे असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत त्यामुळे शिक्षक मुख्याध्यापकाकडून गावातील दानशूर व्यक्तींचा शोध सुरू आहे मात्र दानशूर व्यक्ती किंवा अन्य कोणी सापडले नाही तर शिक्षक मुख्याध्यापकांना स्वखर्चातून तिथी भोजनाचा खर्च करावा लागणार आहे अशी देखील माहिती समोर आली आहे.

         या स्नेहभोजन उपक्रमातून विद्यार्थ्यांना पूर्ण जेवण मिठाई किंवा पूरक पोषक आहार देण्याच्या आदेश आहेत या आहारात मूळ आलेली कडधान्य शेंगदाणे सुकामेवा काजू बदाम पिस्ते मनुका अक्रोड बेदाणे फळे शिजवलेले पदार्थ मिष्ठांन्न इत्यादींचा समावेश असावा असे सांगण्यात आले आहे याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व दानशूर व्यक्तीने एकत्रित निर्णय घ्यावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

        तिथी भोजनातील खाद्यपदार्थ ताजे व पौष्टिक असावे तांदूळ गहू नाचणी शेवगा शेंगाडी सोबत हिरव्या पालेभाज्या यांना प्राधान्य द्यावे. बाजारातील वेस्टर्न पदार्थ तसेच उघड्यावरील किंवा शीळे अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नये यासोबतच जंक पुढच्या हानिकारक प्रभावाबद्दल विद्यार्थी व पालकांमध्ये जागरूकता निर्माण करावे असे निर्देश गोसावी यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)