पवित्र पोर्टल भरतीपुर्वी नांदेडसह राज्याच्या सर्व जिल्हयातील शिक्षकांच्या बदल्या कराव्यात..म.रा.शिक्षक परीषदेची ग्रामविकास मंत्र्याकडे मागणी.

शालेयवृत्त सेवा
0

 

 



जिल्हांतर्गत बदली करणे संदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे मुकाअ याना निर्देश..


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

          ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन साहेब यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद(प्राथमीक विभाग) चे प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेवुन जिल्हांतर्गत बदल्या तात्काळ करण्याचे निर्देश जि.प.प्रशासनाला दयावेत असी मागणी करण्यात आली.

        राज्यातील अनेक शिक्षक मागील अनेक वर्षापासुन दुर्गम आदिवासी जिल्हामधे कार्यरत आहैत,यामधे विस्थापित शिक्षक,महीला शिक्षीका यांचा समावेश आहे.त्यामुळे म रा शिक्षक परीषदेने वेळोवेळी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.त्यामुळे ग्रामविकास विभागाने दि.21जुन 2023,दि.11 मार्च 2024, दि.18 जुन 2024 च्या शासन निर्णयानुसार बदली प्रक्रिया राबवावी असे आदेशीत केले.त्यामुळे  राज्यातील जवळपास दहा जिल्हयामधे जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यात आली आहे.त्याच धर्तीवर नांदेडसह उर्वरीत जिल्हयामधे तात्काळ आॅफलाईन बदल्या करण्यात याव्यात असी आग्रही मागणी ना.मंत्री महोदयाकडे करण्यात आली.

         त्यासोबतच मागील 20 वर्षापासुन कोणत्याही कारणाशिवाय प्रलंबीत असणारा निवडश्रेणीचा प्रश्न निकाली काढावा व 24 वर्ष सेवा झालेल्या पात्र शिक्षकाना निवडश्रेणी लागु करण्याचे आदेश निर्गमीत करावेत ,असीही मागणी करण्यात आली.यावेळी मंत्री महोदयानी मुकाअ मा.मिनल करणवाल याना जिल्हाअंतर्गत बदली व निवडश्रेणी सह सर्व प्रलंबीत प्रश्न सोडवावेत असे निर्देश दिले.यावेळी खासदार डाॅ.अजितजी गोपछडे, आमदार राजेशजी पवार,भाजपाचे जिल्हाध्यक्ष डाॅ संतुकराव हंबर्डे,महानगरअध्यक्ष दिलीपजी कंदकुर्ते,देविदास राठोड यांची उपस्थीती होती.

      शिष्टमंडळामधे प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे,प्रांत संघटनमत्री सुरेश दंडवते, प्रांत प्रसिध्दीप्रमुख दत्तप्रसाद पांडागळे,विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे,जिल्हानेते संभाजी आलेवाड,माहुर संपर्कप्रमुख दिपक गाढवे इ.उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)