आरटीई प्रवेशाला आजपासून सुरुवात..

शालेयवृत्त सेवा
0

 



निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आले एसएमएस 

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरटीई कायदे अंतर्गत खाजगी शाळांतील राखीव जागा वरील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून ऑनलाईन लॉटरीतील विद्यार्थी निवड यादी ही शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार जिल्ह्यातील 2661 जागांसाठी शंभर टक्के निवड झाली असून 2000 विद्यार्थ्यांचे प्रतीक्षा यादीत निवड झाली आहे. मंगळवारपासून प्रत्यक्ष प्रवेश निश्चिती सुरुवात होणार असून 31 जुलै आयुष्याची शेवटची तारीख असणार आहे. 

          2024 25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई कायद्यांतर्गत जिल्ह्यातील 232 शाळांमध्ये मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना 25 टक्के मोफत प्रवेश दिला जात आहे. 2661 जागांसाठी आठ हजार पाचशे पालकांचे अर्ज दाखल केले आहे जागांच्या तुलनेत अर्ज जास्त असल्याने लॉटरी कडे पालकांचे लक्ष लागले होते त्यातच राज्यातील काही खाजगी शाळांनी न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केल्याने लॉटरी जाहीर होऊन निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली नव्हती अखेर जुन्या पद्धतीने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशाचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतरच पुन्हा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे लॉटरी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सोमवारी एसएमएस द्वारे प्रवेशनाची माहिती उपलब्ध झाली आहे मात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रत्न हमीपत्र सह पडताळणी समितीकडे जाऊन 23 ते 31 जुलै या कालावधीत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. 

           दरम्यान निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त झाले आहे मात्र पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील कर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करण्याच्या आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनाला कडून करण्यात आले आहे.


◼️तालुकास्तरावर पडताळणी समिती 

आरटीई पंचवीस टक्के प्रवेश मिळाल्याच्या एसएमएस प्राप्त झालेल्या पालकांसाठी कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी तालुकास्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे त्यामुळे पालकांनी विना विलंब 23 ते 31 जुलै पर्यंत संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्राची पडताळणी करावी पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करावा. असे आवाहन 

 -डॉ. सविता बिरगे 

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)