नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :
शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायखेड यांच्यावतीने वृक्षदिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहादा येथे शिक्षण विभाग पंचायत समिती शहादा, सामाजिक वनीकरण विभाग क्षेत्र शहादा व ग्रामपंचायत रायखेड यांचे संयुक्त विद्यमाने "एक पेड मॉं के नाम" अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायखेड येथे बाल वृक्षदिंडी काढून वृक्ष लागवड बाबत जनजागृती चे आयोजन उत्साहात संपन्न झाले.
या पालखी सोहळ्यात शालेय विद्यार्थ्यांनी बाल वारकर्यांच्या वेशभूषा करून व्यसनमुक्ती, मतदार जनजागृती, वृक्षसंवर्धन, स्वच्छता, शौचालय वापर, शिक्षणविषयक घोषणा व फलक घेऊन रिंगण धरत विठूमाऊलीच्या गजरात जनजागृती केली. सदर कार्यक्रमात पदाधिकारी व अधिकारी यांनीही वृक्षदिंडीचे खांदेकरी झाले.
सदर कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी श्री.योगेश सावळे, सरपंच मा. सौ. उषाताई भिल, उपसरपंच श्री. ऋषीकेश पाटील,ग्रामसेवक श्री. किरण सैंदाणे, सदस्य श्री. राजू पवार, श्री. गणपत गिरासे, कैलास ठाकरे, श्री. विजय पाटील, श्री. विलास मोरे,श्रीम. ठगीबाई पाडवी, श्रीम. कमलाबाई पाटील, श्रीम. अक्काबाई भिल, निकीता पवार, संस्कृती पाटील इत्यादी ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. मनोज बर्डे, श्री. रामकृष्ण लामगे वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण विभाग क्षेत्र शहादा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजकुमार चौधरी, शितल जाधव, साधना वाडीले व वनरक्षक भूपेश तांबोळी, ग्रामस्थ यांनी सहभाग नोंदविला यावेळी महिला आणि युवकांचा सहभाग उत्स्फूर्त होता. वृक्षदिंडी यशस्वी होणेसाठी मुख्याध्यापिका सौ निर्मला सामुद्रे, श्री प्रविण भामरे, सौ. आशा चौधरी, श्रीम वैशाली देसले, श्री राजकुमार पावरा, श्री मधुकर पाडवी व संतोष पवार मेहनत घेतली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .