अवयव दान केलेल्या नांदेडच्या ढोके कुटुंबीयांकडून 'दान पावलं'चं समर्पण

शालेयवृत्त सेवा
0

 

  


स्मृतिशेष अभिजीत अशोक ढोके यांचा तेरावा वगळ्याच उपक्रमाने चर्चेत !

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

निःशब्द शांतता...

निःशब्द ढोके कुटुंबीय...

दिग्मुढ नातेवाईक व आप्तेष्ट...

नीरव शांतता...

या सर्व कठीण परिस्थितीवर मात करायचीच आहे,अशी खुणगाठ मनाशी पक्की बांधलेले ढोके कुटुंबीय व कुटुंब प्रमुख अक्षय ढोके...

अशा परिस्थितीवर काळ हेच औषध असते.

पंधरा दिवसांपूर्वी अवयव दान केलेल्या कै. अभिजित ढोके यांचा तेरावा दिवस कुटुंबीयांनी अत्यंत शोकाकुल वातावरणात केला.

तेराव्याला साधारण तांब्याची भांडी किंवा धार्मिक वस्तू वाटण्याची परंपंरागत रूढी आहे.

या परंपरागत रूढीला फाटा देत, ढोके कुटुंबीयांच्या वैचारिक परिपक्वतेला शोभेसा निर्णय ढोके कुटुंबीयांनी घेतला.

अवयव दाना बद्दल सर्व काही माहिती देणारे 'दान पावलं' हे पुस्तक सर्वांना भेटवस्तू म्हणून देण्यात आले.

याप्रसंगी 'मिशन प्रशासन'चे सहकारी, मुंबई येथील एपीआय सचिन ढोके, पुणे येरवडा कारागृहात अधीक्षक असणारे राजेंद्र मरळे, नांदेडचे नायब तहसीलदार दीपक मरळे, ग्रामसेविका आरतीताई वडगावकर, सध्या दिल्लीस्थित राहून युपीएससीचा अभ्यास करणारा डॉ.वेदांत मरळे तसेच मध्यवर्ती मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नेमीनाथ ढोके, नंदकुमार जगधने, नांदेडचे सामाजिक कार्यातील भीष्माचार्य अशोकराव लोखंडे, अशोक आदमाने व अन्य नातेवाईक हे सर्व सामूहिकपणे ढोके कुटुंबीया समवेत होते. हे प्रत्येकाशी केलेल्या चर्चेतून जाणवले.

अशा प्रसंगी त्या व्यक्तीला मानसिक आधार देणे गरजेचे असते. नांदेडकर, मित्र, आप्तेष्ट व नातेवाईक हे सर्व निष्ठेने करताना दिसत होते. ह्यालाच सामाजिक जबाबदारी म्हणतात.

अध्यक्ष शरदराव भांडेकर यांनीही संभाजीनगर येथील मीटिंगमध्ये जाहीर केल्यानुसार नांदेड येथे एक शोकसभा आयोजित करणार असल्याचे सांगीतले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)