सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
नवी दिल्ली ( शालेय वृत्तसेवा) :
वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा 'नीट' पेपरफुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी विविध याचिकांवर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. त्यात न्यायालय 'नीट' परीक्षा नव्याने घेण्याचे आदेश देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . नीट संदर्भातील सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्यात येत आहे. त्यात देशभरातील उच्च न्यायालयांत दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरीत करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेचा समावेश आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .