नवोदय विद्यालयाचे प्रवेश वेळापत्रक जाहीर

शालेयवृत्त सेवा
0

 



आपल्या पाल्याला जवाहर नवोदय विद्यालयात पुढील वर्षी इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर आजच तयारीला लागा; कारण देशभरात जवाहर नवोदय विद्यालयेचालवणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवोदय विद्यालय समितीने २०२५-२६ वर्षासाठी सहावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. समिती प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या निवड चाचणीसाठी (जेएनव्हीएसटी) नोंदणी १६ सप्टेंबरपर्यंत करता येईल. त्यामुळे मागील काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पालकांना आता प्रवेश परीक्षा अर्ज भरता येणार आहे.

कुठे व कशी नोंदणी कराल ?

■ प्रवेश परीक्षेचा अर्ज ऑनलाइन भरू शकतात, यासाठी navodaya.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

■ संकेतस्थळावर गेल्यानंतर प्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल. आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा.

■ त्यानंतर पालक आवश्यक तपशील भरून आणि आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी अपलोड करून नोंदणी करू शकतील. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून डाउनलोड करा आणि प्रिंट काढा.

ही कागदपत्रे अपलोड करा

■ पालकांनी ऑनलाइन फॉर्म भरण्यापूर्वी अपलोड करावयाच्या कागदपत्रांची स्कॅन केलेली सॉफ्ट कॉपी जतन करून ठेवावी लागणार आहे.

■ विद्यार्थ्याची स्वाक्षरी, पालकांची स्वाक्षरी, विद्यार्थ्याचा फोटो, पालक आणि विद्यार्थ्याची स्वाक्षरी असलेले आणि मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र, आधारकार्ड (जर नसेल, तर इतर कोणतेही वैध रहिवासी प्रमाणपत्र)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)