ऑगस्टमध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबविणार : सोयी-सुविधांची होणार तपासणी

शालेयवृत्त सेवा
0




राज्यातील शाळांची होणार झाडाझडती

पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

          शालेय शिक्षण विभागातर्फे विभागाकडून 'विद्यार्थी गुणवत्ता विकास विकास महाअभियान' अंतर्गत विद्यार्थी गुणवत्ता महाअभियानांतर्गत शिक्षण अधिकाऱ्यांकडून ऑगस्ट महिन्यात शाळांची झाडाझडती घेण्यात येणार आहे. राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना तसेच शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांचा प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन तपासणी केली जाणार आहे.

         गणवेशाची उपलब्धता आहे का? विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी करणे याबाबत प्रत्यक्ष काय स्थिती आहे? पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा प्रभावी उपयोग होतो का? शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती किती आहे, आनंददायी शनिवार उपक्रमाची अंमलबजावणी कशी होते? यासह इतर सोयी-सुविधा, विविध योजनांची संकलित केली आहे. दि. १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत या संदर्भातील अहवाल सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना करावा लागणार आहे.

          केंद्रप्रमुख, शिक्षण शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी सोमवार व शुक्रवार वगळता इतर दिवस शाळांना भेटी द्याव्यात. तसेच सरल पोर्टलवरून गटशिक्षणाधिकारी, अधिकारी/प्राचार्य विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळांना भेटी दिल्यानंतर किंवा निरीक्षण केल्यानंतर त्या संदर्भातील अहवाल लॉगिनमधून दररोज अद्ययावत करणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त शाळा तपासण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे केली आहे.

         शाळांना सुधारणा करण्याची देणार संधी विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानांतर्गत पहिल्या वीस दिवसांत प्रत्यक्ष शाळांना भेट देणे, त्यानंतर पुढील सहा दिवसांत आवश्यकतेनुसार सुधारणा किंवा उपाययोजना करणे तसेच उर्वरित चार दिवसांमध्ये अंमलबजावणी झाली किंवा नाही याची खात्री करणे अशा पद्धतीने या अभियानाची कार्यदिशा ठरवण्यात आली आहे.

कोणत्या बाबींची तपासणी 

१. गणवेशाची उपलब्धता

२. प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा / परसबाग विकास स्थिती / स्वयंपाकगृह उपलब्धता.

३. स्काउट-गाइड प्रशिक्षण व तासाचे आयोजन. ४. विविध संस्थांनी शासनासोबत केलेल्या कराराची अंमलबजावणी.

५. वर्गखोल्यांची स्थिती.

६. स्वच्छतागृहाची उपलब्धता.

७. स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची

अंमलबजावणी.

८. अध्ययन व अध्यापन साहित्याची उपलब्धता. ९. शाळांमधील इंटरनेट सुविधा.

१०. दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष स्थिती.

११. पाठ्यपुस्तकातील कोया पानांचा प्रभाव उपयोग.

१२. विद्यार्थी उपस्थित व आधार नोंदणी. १३. आनंददायी शनिवार अंमलबजावणी. १४. शाळांची वेळ ठरवण्यात बाबतची स्थिती.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)