तृतीय पंथी पांडुरंग गुरव यांची जोगव्यातुन जमा पैशातून आदमापूर प्राथमिक शाळेस १ लाखाची मदत

शालेयवृत्त सेवा
0



( शालेय वृत्तसेवा ) :

       कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील आसगोळी येथील तृतीयपंथी पांडुरंग गुरव यांचे आदमापूर हे मूळगाव नसताना अन तेथील प्राथमिक शाळेशी काडीचाही संबंध नसतानाही जोगवा मागत जमा केलेले एक लाख रुपये स्वतः च्या वृद्धापकाळाचा विचार न करता प्राथमिक शाळेच्या बांधकामासाठी शाळेला दान केले आहेत . जोगवा मागत असताना पदरी बऱ्याचदा हेटाळणीच वाट्याला येणाऱ्या तृतीय पंथीयांनी शिक्षणासाठी केलेली अनमोल मदत समाजातील सभ्य समजणाऱ्या माणसांच्या डोळ्यात मात्र लख्ख अंजन घालणारी ठरली आहे. 

          आसगोळी ता. चंदगड येथील तृतीयपंथीय पांडुरंग गुरव हे गेली वीस वर्षे आदमापूर, वाघापूर व मुरगूड परिसरात जोगवा मागून चरितार्थ चालवत आहेत. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बांधकामासाठी पैशांची गरज आहे. हे कळताच त्यांनी कशाचाही विचार न करता लोकांकडून  दहा, वीस, पन्नास .शंभर असा जोगवा मागत जमा झालेल्या रकमेतून एक लाख रुपये शाळेला दान केले .पांडुरंग गुरव यांचे हे आचरण लोकांसाठी एक अनुकरणीय उदाहरण ठरले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)