शहादा तालुक्यातील मंदाणा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

        जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या परिपत्रकानुसार शहादा तालुक्यातील मंदाणा केंद्रीय शिक्षण परिषद कृषी कॉलेज मंदाणे ता शहादा येथे जि.प. केंद्रशाळा मंदाणे १/२ व जि.प. शाळा इंदिरानगर ३ यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षण परिषद पुष्प १ ले उत्साहात सपन्न झाली. मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले यावेळी बीटचे विस्तार अधिकारी श्री. सुनिल तावडे, केंदप्रमुख श्री. लक्ष्मण परदेशी, जि.प केंदशाळा मंदाणे १ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अरुण पवार, जि.प. शाळा मंदाणे २ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ कविता भिलताई, कृषी कॉलेज चे प्राचार्य, उपप्राचार्य आदी उपास्थित होते. उपस्थित मान्यवराचे श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

       मागील शिक्षण परिषदेचा मागोवाघेण्यात आला नियतकालिक मूल्यमापन चाचणी बाबत जिल्हा स्तरावरून देण्यात आलेल्या पिपिटीच्या आधारे मार्गदर्शन करण्यात आले रुटीन चाचणी बाबत माहिती देण्यात आली शाळा व्यवस्थापन समिती अथवा पुनर्गठीत करून यादी अपलोड करणे. आनंदायी शनिवार उपक्रम दिलेल्या शासननिर्णयाचे वाचन करून शासन निर्णयातील महत्वपूर्ण बाबीचे अवलोकन करणे.

      निर्णयाची अंमलबजावणी करणे अशाप्रकारे मंदाणे केंद्राची पुष्प १ले शिक्षण परिषद खेळीमेळीच्या वातावरणात सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृद उपस्थित होते. जि.प शाळा मंदाणे१/२ व इंदिरानगर यांनी उत्तम मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था केली होती. शेवटी श्रीम. श्रध्दा पवार मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)