पुन्हा एकदा "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा .. ५ ऑगस्ट पासून होणार अभियानाचा आरंभ..

शालेयवृत्त सेवा
0

 



छत्रपती संभाजीनगर ( शालेय वृत्तसेवा ) :

         शाळेच्या शैक्षणिक दर्जा सोबतच भौतिक सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यात एक जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रम राबविण्यात आला होता त्यानंतर आता या अभियानाचा दुसरा टप्पा पाच ऑगस्टपासून सुरू होत आहे या अभियानाची तयारी सोमवारपासून ( तारीख 29 जुलै ) सुरू केली जाणार आहे.

         शाळांमध्ये पायाभूत सुविधा वाढविणे शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे आरोग्य पर्यावरण कौशल्य विकास आर्थिक साक्षरता या विषयावर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे यासाठी राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अभियान राबविण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये राज्यात पाच ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान हे अभियान अविण्यात येणार आहे. 

          शासन पत्रिका नुसार शाळेने सर्व तीस निकष ऑनलाइन भरायचे आहेत त्यानुसार मूल्यांकन समितीकडून तपासणी करण्यात येईल त्यानुसार तालुका जिल्हा विभाग व राज्यस्तरावर प्रत्येकी तीन तीन शाळा निवडण्यात येणार आहे सर्व विजेत्या शाळांच्या पारितोषकासाठी एकूण 7382 लाख रुपये रक्कम निश्चित करण्यात आली आहे असे शासनाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.


निवडीचे निकष :

महावाचन चळवळ वर्गखोल्या प्रयोगशाळा ग्रंथालय वर्ग सजावट वृक्षांची लागवड व जोपासना औषधी वनस्पती फळ व भाजपाला स्काऊट गाईड किशोरवयीन मुलींचे उपक्रम स्वयंरोजगारासाठी केलेले मार्गदर्शन प्रथमोपचार पेटी शालेय रंगरंगोटी परिसर तसेच शाळेची बचत बँक बँकेचे मार्गदर्शन व महत्त्व स्वच्छता मॉनिटर प्रधानमंत्री पोषण शक्ती आहार अमूल बजावणे असे अनेक उपक्रम आहेत.



असे असतील गुण :

◼️पायाभूत सुविधा 33 गुण निकष 13 

◼️शासन ध्येय धोरण अमलबजावणी 34 गुण निकष 15 

◼️शैक्षणिक संपादनूक 43 गुण निकष 11 


अभियानाचा कालावधी :

◼️29 जुलै ते 4 ऑगस्ट अभियानाची पूर्वतयारी 

◼️ 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर अभियानात उपक्रम राबविण्यासाठी एक महिन्याचा कालावधी

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)