जि. प. सीईओ सावनकुमार यांनी सातपुडा पर्वताच्या दुर्गम भागातील वाडाडोंगर (त्रिशुल) जि. प. शाळेला अचानक भेट

शालेयवृत्त सेवा
0



नंदुरबार  ( शालेय वृत्तसेवा ) :

        सातपुडा पर्वताच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडाडोंगर त्रिशुल येथे जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, शिक्षण सभापती गणेशदादा पराडके यांनी अचानक भेट दिली असता शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद विद्यार्थ्यांनी केले सीईओ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. एका विद्यार्थ्याने सांगितले की साहेब तुमच्या सारखा मला मोठे साहेब व्हायचे आहे. साहेबांनी यावेळी उत्तर देताना सांगितले की खूप जिद्दीने अभ्यास करावा लागेल. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पाहणी केली. शाळेचा हिरवागार व स्वच्छ परिसर पाहून केले कौतुक केले. 

            विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भौतिक सोयीसुविधांची केली पाहणी त्यामध्ये  शौचालय, पोषण आहार, परसबाग, शाळेतील सौर ऊर्जा पॅनल, वृक्षारोपन व खेळाच्या मैदानाची केली पाहणी जिल्हा परिषद, नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांचे स्वागत श्री. गणेशदादा पराडके यांनी शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी श्री. गणेशदादा पराडके यांनी आपल्या मनोगतात जिल्हा परिषद शाळा वाडाडोंगर, त्रिशुलच्या भूमीपूजनाचा वेळीचा शालेय प्रसंग विद्यार्थी शाळा प्रवेश घेण्यासाठी सन २०२१-२२ चा विद्यार्थी शाळेत येऊन बसल्याचा प्रसंग सांगितला. शाळेची प्रगतीविषयी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक  श्री. अशोक खैरनार सर यांनी शाळेत

            घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची दिली माहिती. शाळेतील शिक्षक श्री.वसंत तडवी यांच्याशी  चर्चा केली. शाळेला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही. सीईओ यांच्या भेटी दरम्यान श्री. गणेशदादा पराडके सभापती अर्थ व शिक्षण जिल्हा परिषद, नंदुरबार, श्री.लालुसिंग पावरा गटविकास अधिकारी धडगाव, श्री. डी.डी.राजपुत साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, श्री. दिलिपदादा पाडवी पंचायत समिती सदस्य, धडगाव उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सरपंच श्री. सुरेशदादा पाडवी,व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.नवसिंग दादा वळवी,मान्या वळवी ग्रामपंचायत सदस्य गण, डी.एस.पाटील ग्रामसेवक, त्रिशुल व गावातील प्रतिष्ठित नागरिक व स्वयंपाकीण ताई उपस्थित होत्या. शाळेच्या गुणवत्तेबद्दल सीईओ यांनी समाधान व्यक्त केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)