CA अंतिम परीक्षांचे वेळापत्रक झाले जाहीर

शालेयवृत्त सेवा
0

 



 तीनशे केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले

पुणे ( शालेय वृत्तसेव ) : 

       'द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड आहे. अकाउंटंट्स ऑफ इंडिया' (आयसीएआय) ने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) अंतिम अभ्यासक्रमाच्या नोव्हेंबर २०२४ मध्ये आयोजित केलेल्या परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे.

       सीए फायनल गट - १ च्या परीक्षा दि. १, ३ आणि ५ नोव्हेंबर तसेच गट- २ च्या परीक्षा दि. ७, ९ आणि ११ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट : दि. ९ आणि ११ नोव्हेंबर, इन्शुरन्स ॲन्ड रिस्क मॅनेजमेंट टेक्निकल परीक्षा (मॉड्युल एक ते चार) दि. ५, ७, ९ आणि ११ नोव्हेंबर रोजी होतील. भारतातील १२९२ तसेच परदेशातील ८ आशा एकूण

       परीक्षेच्या वेळापत्रकासह आयसीएआयच्या वतीने परीक्षेसाठी अर्ज नोंदणीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार सीए फायनल नोव्हेंबर २०२४ परीक्षेसाठी ७ ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना विलंब शुल्कविना अर्ज भरण्यासाठी २० ऑगस्टपर्यंत मुदत आहे. २३ ऑगस्टपर्यंत सहाशे रुपये विलंब शुल्कासह अर्ज भरता येतील. विद्यार्थ्यांना २४ ते २६ ऑगस्ट या कालावधीत परीक्षा दुरुस्तीची संधी दिली जाईल.

https://www.icai.org/category/ announcements या संकेतस्थळाला भेट द्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)