११७ वा वर्धापन दिनानिमित्त शाळेत केले वृक्षारोपण !
नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :
नवापूर तालुक्यातील मौजे श्रावणी येथे बँक ऑफ बडोदा येथे ११७ वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रावणी येथे ६ फॅन व १५ वृक्षारोपण चे वाटप करण्यात आले आहे. त्यावेळी उपस्थित बँक ऑफ बडोदा शाखा व्यवस्थापक श्री. सुशीलकुमार लांडगे व सहयोगी कर्मचारी यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रावणी येथे प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांसाठी ६ फॅन व १५ वृक्षारोपण वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित असलेले बँक ऑफ बडोदा बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. सुशीलकुमार लांडगे, सहाय्यक व्यवस्थापक अमोल साळुंके, हेड कॅशियर हर्षल पावरा, श्री.प्रज्ञावंत पिंपळे, श्री. दिलवरसिंग वळवी, प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष श्री. गोपाल गावित, जि. प. प्राथ. शाळा श्रावणीचे केंद्रप्रमुख श्री .महेंद्र नाईक, मुख्याध्यापक श्री .भटू बंजारा, शिक्षक श्री. राजेंद्र वसावे, श्रीमती संगीता सोनवणे, श्रीमती मालिनी वळवी, श्रीमती भारती सोनवणे या कार्यक्रमास उपस्थित असलेले श्रावणी गावातील प्रतिष्ठित मंडळी व गावकरी उपस्थित होते.
बँक ऑफ बडोदा श्रावणी येथे वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हा दरवर्षी विविध उपक्रम बँके मार्फत घेण्यात येत असतात. यावेळी ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी उत्तम दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी शालेय वातावरण उत्साहवर्धक करण्यासाठी फॅन, वृक्षारोपण सामाजिक नाविन्यपूर्ण वर्धापन दिन साजरा करण्यात आला. विविध सरकारी याेजनांची माहिती वर्धापन दिनानिमित्त विविध शाखांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. यात सामाजिक सुरक्षा योजना, पीपीएफ, सुकन्या समृद्धी यासारख्या ग्राहक हिताच्या विविध सरकारी याेजनांची माहिती व जनजागृती करण्यात आली. याचप्रमाणे बँकेचे ग्राहक, ठेवीदार, कर्जदार आदी कार्यक्रमास उपस्थित होते. बँकेच्या वाटचालीस शुभेच्छा देतांनाच बँकेच्या व्यवसाय पूर्तीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बँकेच्या सुविधांचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करत बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या बदलांबाबत तसेच डिजिटल बँकिंगबाबत चर्चा केली.
बँकेने अधिकाअधिक ग्राहकाभिमुख योजना आणाव्यात. बँकेच्या घोडदौडीबद्दल माहिती दिली. ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, विमा सेवा, म्युच्युअल फंड आदी याेजना सेवा बँक एकाच छताखाली पुरविते. बँकेच्या विविध क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीबद्दल माहिती दिली. बँकेतर्फे किफायतशीर दरात कर्ज पुरवठा करण्याच्या योजनांची शाखा व्यवस्थापक सुशीलकुमार लांडगे यांनी माहीती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख महेंद्र नाईक यांनी केले. उपस्थितांचे आभार श्रीमती भारती सोनवणे मॅडम यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .