अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे या जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी केली सुट्टी जाहीर , कर्मचारी मात्र राहतील हजर..

शालेयवृत्त सेवा
0

 




अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे या जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी केली सुट्टी जाहीर , कर्मचारी मात्र राहतील हजर..
चंद्रपूर ( शालेय वृत्तसेवा ) :
चंद्रपूर जिल्ह्यात दि. 19 व 20 जुलै रोजी अनेक तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने व अनेक गांवाना पुराचा वेढा पडल्याने जनजिवन विस्कळित होण्याच्या घटना घडल्या आहेत. भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार दिनांक 21/07/2024 व 22/07/2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
            चंद्रपूर जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यावर होऊ नये या करिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये यांना दिनांक 22/07/2024 रोजी जिल्हाधिकारी यांनी  सुट्टी जाहीर केली आहे .
        तथापी या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे व उक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी असे आदेश देखील देण्यात आले आहेत .
            नागरीकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपतकालीन परिस्थितीत खालील दिलेल्या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .
           जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, 
जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर
 संपर्क क्र. 07172250077 / 07172 272480




अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे या जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी केली सुट्टी जाहीर , कर्मचारी मात्र राहतील हजर

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)