उपक्रम : शिक्षकांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि वृक्षारोपण !

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) : 

किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद लोणी शाळेत शिक्षकांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

           शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक कलावंत राहुल तामगाडगे यांचा वाढदिवस ( १० मे ), उपक्रमशील विषय शिक्षिका  विद्या श्रीमेवार ह्यांचा वाढदिवस ( ८ जून ), विद्यार्थीप्रेमी पदवीधर शिक्षक अंकुश राऊत यांचा वाढदिवस ( १० जून ) आणि मुख्याध्यापक तथा राज्य पुरस्कृत शिक्षक श्री रमेश मुनेश्वर यांचा वाढदिवस ( २० जून ) असल्याने त्यानिमित्त लोणी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

        सर्व शिक्षकांचा एकत्रित वाढदिवस आगळावेगळा उपक्रमाने करण्यात आल्यामुळे उपस्थितीतांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवर्धन गुंजकर, गजानन लोंढे, मारोती बादड उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊन पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकासोबतच शैक्षणिक साहित्यही मिळावे यामागील प्रमुख उद्देश होता असे मुख्याध्यापक मुनेश्वर यांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)