आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा..

शालेयवृत्त सेवा
0

 




मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

    २१ जुन हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग हा फार महत्वपूर्ण असतो. योग करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य लागत नाही. योग करण्यासाठी मोठे मैदान, सुसज्ज व्यायाम शाळा, विविध उपकरणे अत्याधुनिक साहित्य या कशाची गरज नसते घरबसल्या कोठेही आपण योग करू शकतो अशी माहिती विजय अवसरमोल या वरिष्ठ क्रीडा शिक्षकाने दिली. 

       अंधेरीतील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहाने व आनंदाने योग दिवस साजरा केला यावेळी स्काऊटच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन स्काऊटचे अधिकारी जितेंद्र महाजन यांनी केले होते. योग व योग्य आहार यांनी आपण आपले शरीर सदृढ राखू शकतो असे मत ग्रंथपाल आरती शर्मा यांनी यांनी आजच्या विशेष योग शिबिरात व्यक्त केले. 

      शालेय विद्यार्थ्यांनी या योग दिवसाचा आनंद घेऊन केवळ आजच्या दिवशीच नाही तर नेहमीच योगासने केली पाहिजे असे मत मांडले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)